Video: अडेगाव येथील ग्रामसभेत वादावादी

वाचनालयाच्या प्रश्नावरून तरुणांची सरपंच, सदस्यांसोबत हमरीतुमरी

0

देव येवले, मुकुटबन: अडेगाव येथे 15 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत गावातील काही तरुण आणि सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसोबत वादावादी झाली. वाचनालयाच्या जागेवरून हा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की अखेर ग्रामसभा रद्द करण्यात आली.

15 ऑगस्टला अडेगावात ग्रामसभा होती. या ग्रामसभेत ग्रामसेवक वाढई यांनी सरकारी आणि निमसरकारी योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी गावातील विविध समस्या ग्रामसभेत मांडल्या. मात्र जेव्हा ग्रामसेवकांनी गावातील वाचनालयाला दिल्या जाणा-या जागेचा मुद्दा मांडला, तेव्हा सरपंच अरुण हिवरकर आणि सदस्य गोविंदा उरकुडे यांनी वाचनालयाला जागा देण्यास असमर्थता दर्शवली. तसंच गावात वाचनालय देण्याची आमची मानसिकता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

(हे पण वाचा: शिरपूर येथे लोकअदालत संपन्न)

गावातील काही तरुण गावात वाचनालय व्हावे यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र सरपंच आणि सदस्यांनी वाचनालयाच्या मुद्यावर उदासिन भूमिका घेतल्यानं तरुणांचा राग अनावर झाला. काही तरुणांची सरपंच आणि सदस्यांशी बाचाबाची सुरू झाली. एकमेकांवर वैयक्तिक दोषारोप सुरू झाले. अखेर वाद वाढत असल्यानं सभा मध्येच बंद करण्यात आली. या ग्रामसभेत चाललेल्या वादावादीचा एक्सक्लुझिव व्हिडीओ वणी बहुगुणीच्या हाती आला आहे.
पाहा काय झाले या ग्रामसभेत?

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.