रानडुकरच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी

दाभाडी वनवर्तुळातील घटना, यवतमाळ येथे भरती

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दाभाडी येथील शेतमजुरावर रानडुकराने हल्ला केला. ही घटना शनिवारी 6 जूनला संध्याकाळी घडली. या घटनेत शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमीचे नाव रामश्या भीमा मडावी (29) असून तो जंगल परिसरात बक-या चरण्यासाठी गेला असताना ही घटना घडली.

रामश्या हा नेहमीप्रमाणे सकाळी स्वतःच्या बकऱ्या घेऊन दाभाडी जंगल परिसरात चारत होता. सायंकाळी 5 वाजता दरम्यान अचानक जंगलातून रानडुक्कर त्याच्या अंगावर धाऊन आले व त्याच्यावर हल्ला चढवला. त्यात रामश्या हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या नाकातील हाड मोडले. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला.

घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकरी धावत आले व जखमीला शिबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारकरिता आणले. मात्र दवाखान्यात डॉक्टर हजर नसल्याने धावपळ सुरू झाली. दवाखान्यात दोन कर्मचारी होते परंतु जखमीला रेफर करणारा डॉक्टर नसल्याने फजिती झाली. उपस्थित कर्मचारी यांनी ऐम्बुलन्समध्ये डिजल टाकून नेण्यास सांगितले.

350 रुपयांचे डिजल टाकून जखमीला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. परंतु त्यानंतर यवतमाळ येथे हलविण्यात आले. एवढे मोठे प्रकरण होवूनही वनविभागाच्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी जखमींची भेट किंवा साधी विचारपूस सुद्धा केली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

लॉकडाऊन काळात शासनाने अधिकारी व कर्मचारी याना मुख्यालय राहण्याचे सक्त आदेश असताना दवाखान्यात डॉक्टर नाही. तर वनविभागाचे अधिकारी वणी व इतर ठिकाणावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे. जखमी रामश्या याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुटुंबियासह गावकऱ्यांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.