कोरोना तपासणीचे नमुने घेण्याची तालुका स्तरावर सुविधा

तज्ज्ञांची नेमणूक: कोविड केअर सेंटर व्हीटीएम किट उपलब्ध

0

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणू संसर्गाच्या संशयीत रुग्णांचे तपासणीसाठीचे स्वॅब (घशातील स्रावांचे नमुने) घेण्याची सुविधा आता तालुकास्तरावरच उपलब्ध झाली आहे. त्यासाठी लागणा-या पुरेशा व्हीटीएम किट व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत. मुख्यालय असणा-या कोविड केअर सेंटरमध्ये त्यासाठी चार तज्ज्ञांची नेमणूकही करण्यात आली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या संदिग्ध रूग्णांच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेत असताना विशेष खबरदारी बाळगावी लागते. ही सुविधा पूर्वी केवळ जिल्हा सामान्य रूग्णालयातच उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या संशयीत रूग्णाची त्यात गैरसोय व्हायची.

यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अलगीकरण कक्षात संदिग्ध रुग्णांची गर्दीही वाढायला लागली होती. त्यामुळे आता तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटर मध्येच संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्रावाचा नमुना घेऊन तो परस्पर व्हीआरडीएल लॅब कडे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.

याकरिता लागणा-या व्हीटीएम किट दैनंदिन रुग्णवाहिकेव्दारे तालुकास्तरावर पाठविण्यात येत आहेत. यामुळे संदिग्ध रुग्णांची सोय होण्यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयावरील अतिरिक्त ताण कमी झाला आहे. तसेच कोराना संदिग्ध रुग्णांचा त्रास कमी झाला असून, त्यांची गैरसोय थांबली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.