शिबला येथे मटका अड्यावर धाड

एलसीबीची कारवाई, एकाला अटक

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील चौकात सुरू असलेल्या मटका अड्यावर एलसीबीने धाड टाकून एका व्यक्तीस अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ येथील एलसीबी पथकाला शिबला येथे छुप्यारितीने मटका सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

एलसीबीच्या पथकाने सोमवारी 8 जून रोज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान शिबला येथील मुख्य चौकात सुरू असलेल्या मटक्यावर धाड टाकली. यात आरोपी संतोष दुधकोहळे रा शिबला याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1230 रुपये नगदी व मटका साहित्य जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पीएसआय श्रीकांत जिंदमवार यांच्यासह उल्हास कुरकुटे गजानन डोंगरे, कबिश पानेकर, किशोर झेंडकर व नितीन मडसे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.