कमळवेल्ली ग्रामपंचायतद्वारा दूषित पाणीपुरवठा

युवा सेना विभाग प्रमुख यांची तक्रार

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कमळवेल्ली ग्रामपंचायत मार्फत ग्रामवासीयांना गावातीलच सार्वजनिक विहिरीतून दूषित पाणीपुरवठा करून आरोग्याशी खेळत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. युवासेनेचे विभाग प्रमुख अनिल डेगरवार यांनी ही तक्रार केली आहे.

कमळवेल्ली ग्रामपंचायत अंतर्गत गावातील प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्यात आले आहे. गावातील सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित असल्यामुळे गावकऱ्यांना पिण्यास अयोग्य आहे. परंतु गावकऱ्यांना विहिरीचे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावे लागत आहे.

अनिल डेगरवार

गावात वॉटर फिल्टरचे काम पूर्ण होऊनही गावकऱ्यांना वॉटर फील्टरचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तरी चौकशी करून सार्वजनिक विहिरीचे दूषित पाणीपुरवठा बंद करून वॉटर फिल्टरचे शुद्ध पाणी गावकऱ्यांकरिता खुले करून द्यावे अशी तक्रार युवासेनेचे विभाग प्रमुख अनिल डेगरवार यांनी गटविकास अधिकारी सह वरिष्ठ अधिकारी तथा पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.