एलआयसीने काढले 1339 दावे निकाली, ग्राहकांना 6 कोटींचे वितरण
लॉकडाऊनच्या कठिण काळातही एलआयसीला यश
विवेक तोटेवार, वणी: कोरोना संसर्गाच्या काळात कठिण परिस्थिती असतानाही एलआयसीच्या वणी शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत 1339 दावे निकाली काढत ग्राहकांना सुमारे 6 करोडचे वितरण केले आहे. यासह कर्जवाटपातही संपूर्ण 100 टक्के ग्राहकांच्या केसेचचा निपटारा केला. वार्षीक अहवालाच्या बाबतीतही आघाडी घेत विभागीय कार्यालय अमरावती यांना सर्वप्रथम वणी शाखेचा अहवाल प्राप्त झाला आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात 22 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यातून शासकीय कार्यालयाला जरी सुट देण्यात आली असली तरी कर्मचारी आणि वेळेचे बंधन घालण्यात आले होते. मात्र अशा आणिबाणीच्या काळातही एलआयसीच्या वणी शाखेद्वारा ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत एलआयसीचे ब्रिदवाक्य ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ याचा प्रत्यय आणून दिला.
कर्जवाटपाच्या शंभर टक्के केसेसचा निपटारा
ग्राहकांचा आजही बचतीसाठी एलआयसीवर विश्वास आहे. लॉकडाऊऩच्या काळात सर्वसामान्यांवर आर्थिक संकट आले. यातून बाहेर काढण्यासाठी अऩेक ग्राहकांनी कर्जासाठी अर्ज केला होता. लॉकडाऊनच्या काळात ज्या ग्राहकांनी कर्जासाठी अर्ज केला होता त्या सर्वच्या सर्व केसेसचा निपटारा करण्यात आला असून त्या प्रत्येक गरजूंना कर्ज वाटप करण्यात आले. 100 टक्के कर्जवाटपाच्या केसेसचा निपटारा करून प्रत्येक ग्राहकांचे समाधान करण्यात वणी शाखेला यश आले आहे.
सहकारी व अभिकर्त्यांच्या परिश्रमामुळेच उत्कृष्ट कामगिरी – कमाने
लॉकडाऊनचा काळ कठिण होता. प्रशासनाने केवळ 10 टक्के कर्मचा-यांसह काम करण्याचे आदेश दिले होते. त्यातही वेळेचे बंधन होते. लॉकडाऊनचा काळ गंभीर असल्याने यात लवकरात लवकर दावे निकाली काढणे गरजेचे होते. तसेच ज्या ग्राहकांनी कर्जसाठी अर्ज केले होते त्यांचेही समाधान करण्याचे चॅलेन्ज आमच्यासमोर होते. मात्र माझ्या सर्व टीमने परिश्रम घेऊन 1339 दावे निकाली काढले. कर्जवाटपाच्या सर्व केसेस निकाली लावून प्रत्येक ग्राहकांचे समाधान करण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
– रविंद्र कमाने, शाखाधिकारी एलआयसी वणी शाखा
लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी एलआयसीने अत्यंत कमी कर्मचारी व कमी वेळेत उत्कृष्ठ सेवेचा आदर्श समोर ठेवला आहे. त्याबाबत ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शाखाधिकारी रविंद्र कमाने व शाखा अधिकारी (विक्री) मोरेश्वर राऊत यांच्या मार्गदर्शनात मिळवलेल्या या यशात वणी शाखेतील कर्मचारी, अधिकारी व अभिकर्ता यांचे सहकार्य लाभले.