लॉकडाउने नियम झुगारून कौटुंबिक समारंभात होताहेत गर्दी

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज मागणी

0

जितेंद्र कोठारी, वणी: देशात सुरू कोरोना महामारीचा संक्रमण आणि लॉकडाउनमुळे यंदा लग्नसराईच्या सिझनमध्ये खूप कमी लग्न होत आहे. काही लोकांनी पुढील काही महिन्यापर्यंत लग्न समारंभ करणे टाळले आहे. मात्र शहरातील काही मंगल कार्यालय व खाजगी जागेत होणाऱ्या लग्न, साक्षगंध व वाढदिवस सारख्या कार्यक्रमात लॉकडाउन कायदा व सोशल डिस्टनसिंगचा उल्लंघन करून कार्यक्रम होत असल्याचे बघायला मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून वणी शहरात कोरोना पोजिटिव्ह रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अकारण घराबाहेर न पडण्याची, मास्क लावण्याची व सावधगिरी बाळगण्याची वारंवार सूचना दिल्या जात आहे. मात्र शहरातील मंगल कार्यालय, मॅरिज लॉन्स व घरगुती होणाऱ्या लग्न, साक्षगंध, वाढदिवस कार्यक्रमात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची तक्रारी त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.

प्रातिनिधिक फोटो

लग्न समारंभात जास्तीत जास्त 50 पाहुण्यांचा सहभाग, कार्यक्रम स्थळ सॅनिटायझरने स्वच्छ करणे, आलेल्या सर्व लोकांनी मास्क लावणे, सोशल डिस्टनसिंग ठेवण्याचे नियम आहे. परंतु शहरातील काही मंगल कार्यालयात तसेच घरगुती कार्यक्रमातसुद्दा लॉकडाउन नियमाला धाब्यावर बसवून 100 ते 250 पाहुणे मंडळी जमा होत असतांना स्थानिक प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याची ओरड होत आहे. त्या व्यतिरिक्त शहरात अनेक ठिकाणी लपून छपून होणारी दारू व मटण पार्ट्यामुळे कोरोना पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहरात कोविड पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 7 झाली आहे.

त्यामुळे प्रशासनाने शहरात लग्न समारंभ वगळता इतर सामाजिक, धार्मिक, राजकीय व गेट टूगेदरच्या नावावर होणाऱ्या कार्यक्रमावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.