सावधान… अत्याधुनिक वाहनाद्वारे 3,682 वाहनांवर कारवाई
नियम मोडणा-यांना 14 लाखांचा अनपेड दंड
नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता, इंटरसेप्टर या आधुनिक कारच्या साहाय्याने वाहतुकीचे पालन न करणाऱ्या तब्बल 3,682 वाहनावर कारवाई करून, एकूण 13,74,200/- रुपयांचा अनपेड दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई महामार्ग पोलीस मदत केंद्र, करंजी यांनी केली आहे.
कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर 1 जून ते 30 जून 2020 या कालावधीत भरधाव वेगाने (Ovar speed) वाहन चालविणाऱ्या 644 वाहनावर 6,44,000/-हजार रुपयांचा अनपेड़ दंड इंटरसेप्टर वाहनाद्वारे करण्यात आला. तसेच लेन कटिंग, डेंजरस पार्किंग, धोकादायक रित्या मालाची वाहतूक व इतर मोटर वाहन कायद्या अंतर्गत विविध कलमाखाली 3,038 वाहनावर कार्यवाही करुण 7,30,200/-हजार रूपयाचा अनपेड़ दंड असे एकूण 3,682 वाहनावर कार्यवाही करून एकूण 13,74,200/- रूपयाचा अनपेड़ दंड ठोकण्यात आला.
ही कारवाई मा.पोलीस अधीक्षक ,एम.राजकुमार महामार्ग पोलीस विदर्भ विभाग नागपूर चे संजय शिंत्रे, पोलीस उपअधीक्षक सा. महामार्ग पोलीस विदर्भ विभाग नागपूरचे सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शनात महामार्ग पोलीस मदत केंद्र, करंजी येथील प्रभारी सहायक पो. नि. संदीप मुपडे, सहायक पो.उपनिरीक्षक विनोद कुमार तिवारी व सर्व वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
वाहतुकीचे नियम मोडणा-यांनो सावधान…!
इंटरसेप्टर वाहनामध्ये अत्याधुनिक स्वरुपातील विविध उपकरने आहेत. या वाहनातील “लेझर स्पीड गन” या उपकरणाद्वारे महामार्गवरुन धावणाऱ्या वाहनाचा वेग संतुलित ठेवणे व भरधाव वेगाने वाहन चालविणार्यावर कारवाई करुन चालान करता येणे आता वाहतूक पोलिसांना सुलभ झाले आहे. तसेच वेग मर्यादेचे उल्लंघन करणारे वाहन चालान केल्या नंतर सबंधित वाहन मालकाच्या मोबाइल वर परस्पर संदेश पाठविला जातो. याशिवाय विना हेल्मेट दुचाकी चालविणारे चालक व सिट बेल्ट न लावणाऱ्या चालकावरही करवाई करणे सोपे झाले आहे. चारचाकी वाहनाच्या काचावर लावलेली ब्लॅक फ़िल्म सुद्धा तपासणी केली जाते. ब्लॅक फ़िल्म ही सदोष असल्याचे उपकरणाद्वारे आढळून आल्यास मोटर वाहन कायद्यनुसार चालनाद्वारे दंड आकारणी सुद्धा केली जाते.