पावसाळा सुरू होताच पळसोनीतील रस्ता माखला चिखलाने
ग्रामस्थांचे रस्त्यासाठी ग्रामपंचायतीला निवेदन
विवेक तोटेवार, वणी: पळसोनी गावात जाण्याकरिता असलेल्या मुख्य रस्त्यावर चिखल झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता वाहतुकीस योग्य करावा अचे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.
वणीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले पळसोनी हे गाव आहे. पळसोनी हे गट ग्रामपंचायत असून यामध्ये परसोडा, पळसोनी व झटपट ही गावे येतात. तर पळसोनी येथे ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे. गेल्या पाच वर्षांपासून या गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम झालेले नाही. पावसाळा असल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल झाले आहे. ग्रामवासीयांना ये जा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे या गावातील काही नागरिकांनी मुख्य रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याबाबत निवेदन दिले.
अगदी काही आठवढ्यापुर्वी स्मशानभूमी नसल्याने याच गावातील सितारामजी बेलेकार यांच्या प्रेत वाहून गेले होते. तरीही ग्रामपंचायतीला जाग आली नाही व स्मशानभूमी बनविण्यात ग्रामपंचायत उदासीन दिसून आली. ज्यामुळे ग्रामस्थांनी स्वतः लोकवर्गणीतून स्मशानभूमी बनविण्याचा निर्णय घेतला. या स्मशानभूमीचे काम सुरू झाल्याची माहिती आहे.