रक्तपेढी व ट्रामा केयर सेंटरच्या मागणीसाठी रक्तानं लिहिलं निवेदन

गेल्या अनेक वर्षांपासून रक्तपेढीची होत आहे मागणी

0

वणी: कित्येक वर्षांपासून वणीत रक्तपेढी व ट्रामा केयर सेंटरची मागणी होत आहे. या मागणीसाठी ‘रक्तदान महादान’ फाउंडेशन तर्फे रक्तानं लिहिलेलं निवेदन देण्यात आले. रक्तदान महादान फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश पाचभाई यांनी स्वतःच्या रक्तानं निवेदन लिहून रविवारी खासदार आणि राज्यमंत्री हंसराज अहिर यांना सादर केले.

वणी येथे जेव्हा एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासते तेव्हा चंद्रपूर, यवतमाळ किंवा नागपूरशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे यात 4 ते 5 तासांचा वेळ जातो. अनेकदा रक्ताअभावी रुग्णाचा जीवही धोक्यात येतो. वणी हा आदिवासी बहुल भाग आहे. त्यामुळे परिसरातील अनेक रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन रक्त आणणे खर्चिक बाब आहे. त्यामुळे वणीमध्ये रक्तपेढी द्यावी अशी मागणी रक्तदान महादान फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून रक्तदान महादान फाउंडेशन रक्तपेढी आणि ट्रामाकेअरची मागणी करत आहे. मात्र त्यांच्याा मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं. अखेर प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी मंगेश पाचभाई यांनी रक्तानं निवेदन लिहून सादर करण्याचा पावित्रा उचलला.

(हे पण वाचा: शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर पोळ्यातही संकट)

खासदार आणि राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यावेळी रक्तपेढी आणि ट्रामाकेअरबाबत पाठपुरावा करून, यासाठी फंड पुरविण्याचं आश्वासन दिलं आहे. जर प्रशासनानं मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन सादर करते वेळी शिष्टमंडळात हकीम हुसेन, समीर शेख, नितीन पेंदाम, अतुल पोहणे, मदन चिवंडे, सत्यम गाणार, प्रकाश नागरकर, विवेक धोटे, महेश म्याकलवार, गणेश पेटकर, शुभम दलाल, मयूर मदनकर, विशेष गिरी, नितिन टेकाम, राजा चौधरी, अरविंद बोरकर आदी उपस्थित होते

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.