हिंदू धर्मातील सर्व समाजाला पूजऱ्यांचे प्रतिनिधित्व द्या

अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्रतिनिधित्वासासाठी निवेदन

0

पुरूषोत्तम नवघरे, वणी: प्रभु रामचंद्र हे तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असून या मंदिर निर्माण ट्रष्ट मध्ये आणि मंदिरातील पूजऱ्यांमध्ये हिंदू धर्मातील सर्व जातींना प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी गुरुदेव सेनेकडून करण्यात आली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की अनेक वर्षा पासून हिंदूंचे दैवत असलेले श्रीरामाचे मंदिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निर्माण होणार आहे. सन १९९० मध्ये मंदिर निर्माणासाठी काढलेल्या रथयात्रेमध्ये कार सेवक म्हणून हिंदू धर्मातील obc, sc, st, vjnt, dnt मराठा व इतर सर्व जातीचे तरुण व रामभक्त सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या दंगलीत हजारो कार सेवक शहीद झाले होते. त्या शाहिदांचे बलिदान म्हणून आज अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री राम मंदिराचा प्रश्न मोदी सरकार ने मार्गी लावला आहे.

या मंदिर निर्माण ट्रष्ट मध्ये व मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या सेवेत पुजारी म्हणून हिंदू धर्मातील सर्व जातींच्या लोकांचा सहभाग असायला पाहिजे. यात जर हिंदुतील एकाच समाजातील लोक सहभागी असेल तर हा इतर हिंदू समाजाचा घोर अपमान आहे. असे कृत्य देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून घडू नये साठी हिंदुतील सर्व समाजाच्या लोकांचे प्रतिनिधित्व समानतेच्या आधारावर सन्मानाने या प्रस्तावित श्री राम मंदिरात असावे व सर्वांना श्री रामाची सेवा करण्याची संधी मिळावी. असे निवेदनात म्हटले.

यावेळी गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर मुख्य संघटक मिलिंद पाटील, पुंडलीककाका मोहितकर, निखिल झाडे आदीं उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.