सिकलसेल रुग्णांसाठी डॉक्टर नसल्याने हाल

रुग्णाची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार

0

सुशील ओझा, झरी: तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील मांडवी येथील रहिवासी असलेले सिकलसेल रुग्ण संदीप सुरपाम याने गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सिकलसेल संबधित माहिती व औषधी देणारे डॉक्टर नसल्याने मोठे हाल होत असल्याची तक्रार केली आहे.

तालुक्यात सिकलसेल तज्ज्ञ डॉ नसल्याने वारंवार यवतमाळ येथे उपचारा साठी जावे लागते. सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने यवमाळमधील दवाखान्यात जाणे धोकादायक आहे. तसेच बसेस बंद असल्याने आर्थिक भुर्दंड देखील सोसावे लागत आहे.

यापूर्वी मांडवी येथे दोन महिला कर्मचारी सिकलसेलबाबत रुग्णांना माहिती व औषधी देत होत्या. परंतु त्यांची बदली झाल्याने कुणीही औषध व माहिती सुद्धा देत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अश्या परिस्थितीत सिकलसेल रुग्णाला अती संकटाचा सामना करावा लागत आहे.

वेळेवर उपचार व्हावा, गोळ्या, ओषधी, रक्त मिळावे यासाठी तालुक्यात या रुग्णाची सोय, उपचार व्हावा अशी मागणी घेऊन मांडवी येथील संदीप सुरपाम यांनी गटविकास अधिकारी सुधाकर जाधव याच्या कडे तक्रार केली असून त्वरित तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.