झरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सेना-काँग्रेसचा झेंडा
दोन माजी आमदारांनी रोखला भाजपचा विजयी रथ
देव येवले, मुकुटबन: झरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप बुर्रेवार यांची, तर उपसभापतीपदी सेनेचे संदीप विंचू यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
या निवडणुकीत सेना-काँग्रेस यांचे 11, तर भाजपा 7 एवढे मताधिक्य असल्याने सेना-कॉंग्रेसला विजय मिळवण्यास सहज शक्य झाले. या निवडणुकीत भाजपा तर्फे सभापतीचे दावेदार ज्योती वराटे तर उपसभापती साठी बापुराव जिन्नावार यांना पराभव पत्करावा लागला.
ही निवडणूक आमदार बोदकुरवार यांच्या प्रतिष्ठेची बनली होती. पण दोन्ही माजी आमदारांनी भाजपाचा विजयी रथ रोखून धरला. याविजया नंतर बाजार समितीच्या आवारात सेना-काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
(हे पण वाचा: विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी धावले दोन आमदार, मात्र स्थानिक आमदार गायब)
मिळालेली मतं –
सभापती:
संदीप बुर्रेवार, काँग्रेस (11)
ज्योती वराटे, भाजप (7)
उपसभापती:
संदीप विंचू, शिवसेना (10)
जिन्नावार, भाजप (7)
1 अवैध