विपरित परिस्थितीतही कनिष्काने मिळवले सुयश

अर्जनवीस संघटनेने केला तिचा सत्कार

0

गणेश रांगणकर, गणेशपूरः येथील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी कनिष्का संजय जीवने हिने दहावीच्या परीक्षेत सुयश मिळवलं. तिच्या या यशासाठी अर्जनवीस संघटनेने तिला ऑक्सफोर्ड डिक्शनरी देऊन सत्कार केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये कनिष्काने दहावीची तयारी केली. प्रचंड अभ्यास आणि मेहनतीवर भर दिला. तिला दहावीत 96.80 टक्के गुण मिळालेत. तिचे वडील अर्जनवीस आहेत. परिवारातील सदस्यांनी तिला जमेल तेवढं सहकार्य केलं. पुढे वैद्यकीय शिक्षण घेण्याचं कनिष्काचं स्वप्न आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, मुख्याध्यापक, शिक्षक आणि हितचितकांना देते.

Leave A Reply

Your email address will not be published.