सिंधीवाढोणा व राजूर येथील शाळेला भेट

धनोजे कुणबी महिला आघाडी वणीची मदत

0

जब्बार चीनी, वणी: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वणीतील धनोजे कुणबी महिला आघाडीने जि.प. प्राथमिक शाळा सिंधीवाढोणा व जि. प. प्राथ शाळा राजुर येथे भेट दिली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या उपयोगी पडतील अशी कराओके सांउड सिस्टीम या शाळेंना भेट देण्यात आली. यावेळी शहीद राजेंद्र कुळमेथे यांच्या वीरपत्नी माया राजेंद्र कुळमेथे यांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना वंदना आवारी म्हणाल्या की गावातील विद्यार्थी घडणे, मोठ्या पदावर जाणे ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी व शाळेसाठी मदत करण्यास आम्ही कायम तत्पर राहू. संध्या नांदेकर यांनी मनोगत व्यक्त करताना महिला आघाडीच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली व शाळेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले.

सिंधीवाढोणा येथील कार्यक्रमात शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष दिवाकर महाकुलकर, गावाचे पोलीस पाटील गानफाडे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष घुगुल, शाळेचे मुख्याध्यापक वाटेकर तसेच सहाय्यक शिक्षक मुत्त्यमवार, नेहा गोखरे, हर्षदा चोपने, गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

तर राजूर येथील कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य संदीप भगत, सरपंच प्रणाली अस्लम, शाळा शिक्षण समीतीच्या अध्यक्ष सोनाली भुसारी, शाळेचे मुख्याध्यापक निरे, सहाय्यक शिक्षिका स्वप्ना पावडे, छाया वागदरकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

संघटनेतर्फे अध्यक्षा वंदना आवारी, उपाध्यक्षा कविता चटकी, सचिव साधना मत्ते, कोषाध्यक्ष मिनाक्षी देरकर, सहसचिव लता वासेकर, संस्थापिका संध्याताई नांदेकर, माजी अध्यक्षा किरण देरकर, साधना गौरकार, अर्चना बोदाडकर, वृंदा पेचे, ज्योती सूर, माया गौरकार, स्वप्ना पावडे, संध्या बोबडे इ यांची उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.