कोरोना पसरवतोय पोलीस विभागात हातपाय…

आज 4 रुग्ण, यात 1 पोलीस व 1 होमगार्ड पॉजिटिव्ह

0

जब्बार चीनी, वणी: कोरोनाने आता अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणा-या विभागात हातपाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. आज वणीत पोलीस विभागातील 1 व गृहरक्षक दलातील 1 असे दोन कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहे. यासह शास्त्रीनगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती व चिंचोली येथील रुग्णाच्या संपर्कात आलेली शिंदोला येथील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आली आहे. आज 4 रुग्ण आढळून आले आहेत यातील 3 पुरुष तर 1 महिला आहे. आता वणीत कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 67 झाली आहे.

कोरोना पसरवतोय पोलीस विभागात हातपाय…
काल सोमवारी वणीतील छोरीया अपार्टमेन्ट येथील पोलीस विभागातील एक व्यक्ती कोरोना पॉजटिव्ह आढळून आली होती. सदर व्यक्ती दिनांक 5 ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे कामानिमित्त गेली होती. तिथून परत आल्यानंतर त्यांना ताप आला होता. त्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली होती. मात्र ताप कमी न झाल्याने व कोरोनाचे लक्षणं आढळल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने कोरोनाची चाचणी केली असता ती पॉजिटिव्ह आढळून आली.

आरोग्य विभागाने आज तातडीने पोलीस विभागातील व त्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवा देणा-या गृहरक्षक दलाच्या कर्मचा-यांची कोरोनाची चाचणी केली. यात वणीतील एक पोलीस कर्मचारी तसेच परिसरातील एका खेड्यातील व सध्या कामानिमित्त वणीत राहणारी गृहरक्षक दलातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आली आहे.

शास्त्रीनगर आणि चिंचोलीची साखळी वाढली
शास्त्रीनगर येथील एक व्यक्ती यवतमाळ येथे गेली होती. तिथून आल्यावर त्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षणं आढळून आल्याने त्या व्यक्तीने कोरोनाची टेस्ट केली होती. रविवारी ही व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाली. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे.

चिंचोली येथे 13 ऑगस्टला कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले होते. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेली शिंदोला येथील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे चिंचोली गावातील साखळी वाढत असून यात आता 3 रुग्ण झाले आहेत.

आज वणीत एकूण 46 व्यक्तींच्या रॅपिड ऍन्डिजन टेस्ट करण्यात आल्या. यातील 4 टेस्ट या पॉजिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वणीत आता कोरोनाचे एकूण रुग्ण 67 झाले असून यातील 49 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 16 व्यक्ती ऍक्टिव्ह आहेत. यातील 14 रुग्णांवर वणीतील कोविड केअर सेन्टरमध्ये तर 2 रुग्णांवर यवतमाळ जीएमसी येथे उपचार सुरू आहे. सध्या कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात वाढत असून शहरात 5 कन्टेन्टमेंट झोन तर ग्रामीण भागात 9 कन्टेन्टमेट झोन आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.