विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशमूर्ती स्थापन करण्याची परवानगी प्रशासन देणार नाही असे वाटत होते. परंतु अटीशर्तींसह सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी मोठा पंडाल किंवा गाजावाजा न करता एखाद्याच्या घरी किंवा मंदिरात गणेशमूर्तीची स्थापना करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शहरात अशा प्रकारे 25 तर ग्रामीण भागात 6 सार्वजनिक गणेश मंडळाला परवानगी देण्यात आली आहे.
जनतेच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन काही अटी शर्थीचे पालन करण्याच्या अटीवर काही गणेश मंडळाला सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शहरात अशा प्रकारे अटीशर्तीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या 25 मंडळाला परवानगी देण्यात आली आहे.
तर ग्रामीण भागात 6 गणेश मंडळाला परवानगी देण्यात आली आहे. परंतु गणेशमूर्तीची स्थापना सार्वजनिक खुल्या ठिकाणी न करता मंडळाच्या कार्यकर्त्याच्या घरी किंवा मंदिरात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्वांनी शासनाने ठरवून दिलेल्या अटींचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याची विनंती ठाणेदार वैभव जाधव यांनी वणीकरांना केली आहे.