कुरई येथील महिलेचा शेतात मृत्यू

डोर्ली बसथांब्यानजीकच्या शेतातली घटना

0

तालुका प्रतिनिधी, वणी: कुरई येथील महिलेचा शेतात शनिवारी दुपारी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शीलाबाई बंडू ठाकरे (40) असे मृत महिलेचे नाव आहे. तालुक्यातील कुरई येथील शेतकरी बंडू ठाकरे यांचे डोर्ली बसथांब्यालगत शेत आहे. सदर शेतात मुलगा कपाशीवर कीटकनाशकाची फवारणी करीत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तर शीलाबाई निंदण करीत होत्या. दुपारी बारा वाजताच्या सुमारास शीलाबाई गंभीर अवस्थेत शेतात पडून मुलाला दिसली. तिचा उपचारापूर्वीच झाला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. वणीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आलेत. तिच्या मागे पती, दोन मुले आहेत. सदर घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.