झरपट येथे दोन चिमुकल्यांना विषबाधा 

खेळता खेळता खाल्लं कीटकनाशक

0
रवि ढुमणे, वणी: वणी तीलुक्यातील झरपट येथील दोन मुलांनी पलंगाखाली ठेवलेले किटकनाशक खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.  हा प्रकार लक्षात येताच त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
झरपट येथील विलास कालेकर या शेतकऱ्याने शेतातील पिकावर फवारणी करण्यासाठी बाजारातून कीटकनाशके खरेदी केले होते. कीटकनाशके घरातील पलंगाखाली व्यवस्थित ठेवले होते.  सकाळी विलासचा आठ वर्षांचा नवनीत व साडेपाच वर्षांचा लहान नैतिक हे दोघेही खेळत होते.  दरम्यान पलंगाखाली त्यांनी एका खरड्याची पेटी दिसली. उत्सुकतेपोटी ती पेटी मुलांनी उघडली त्यात प्लॅस्टिकचे चमचा दिसल्याने पेटीतील पॅकिंग असलेला कागदी डबा सुद्धा उघडला.
त्यात पावडर दिसल्याने दोघांनाही खाण्याचा मोह आवरता आला नाही. नवनीत आणि नैतिक या दोघांनी एक एक चमचा भरला आणि मुखात टाकला. तोच त्यांना वेगळीच चव लागल्याने दोघेही खोकलत बाहेर पडले. हा प्रकार विलासच्या लक्षात आला. त्याने विलंब न करता दोघांनाही वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

(शेतात वीज कोसळून दोन महिला ठार) 

नवनीत व नैतिक विलास कालेकर या दोनही चिमुकल्याना विषबाधा झाल्याचे दिसून आल्याने डॉक्टरांनी उपचार सुरू केले.  मात्र नेमके औषधातील घटक कोणते आहे ही तपासणी झाल्यावरच पुढील उपचार करता येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ सुनीलकुमार जुमनाके यांनी सांगितले आहे. दोघांनाही चोवीस तास रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.