मोकाट जनावरांना आळा घालणार कोण ?

वाहनधारकांना सहन करावा लगातोय त्रास, नगरपालिका प्रशासन सुस्त

0

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये वाढत्या मोकाट जनावरांच्या संख्येमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही जनावरे दिवसभर रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण करताना दिसून येत आहे. कुठल्याही चौकात गेले तरी हीच परिस्थिती पहावयास मिळते. यामुळे अनेकदा दुचाकीस्वारकांचा किरकोळ अपघातही झाला आहे. मात्र इतके होऊनही नगर पालिका प्रशासनला जाग येताना दिसून येत नाही.

मोकाट जनावरांमध्ये गोवंशासोबत वराहांची संख्याही दिसेंदिवस वाढत आहे. पण प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. वराहांच्या समस्येमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. भर पावसाळ्यात मोकाट वराहांच्या समस्येमुळे वणीकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र नगर परिषदेद्वारा यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध असल्याचे दिसत नाही.

गौवंशावर आळा घालण्यासाठी कोंडवड्याची व्यवस्था आहे. पण याकडे नगर पालिकेचं दुर्लक्ष झाल्यानं कोंडवड्यात जनावरे नेणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेकदा तक्रारीही देण्यात आल्या. पण संबधित प्रश्नांवर तोडगा काढण्यात नगर परिषद पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे.

रस्त्यावरचे मोकाट गोवंश आणि वराह यामुळे दुचाकीस्वारांचे किरकोर अपघात झाले आहेत. महिला दुचाकीस्वारांनाही अपघाताला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा वणीकर जनता नगर पालिकेकडून करीत आहे..

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.