नरसाळा येथे दिवसातली दुसरी आत्महत्या

युवकाने घेतले विष, सर्व परिसराला धक्का

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात होत असलेल्या सतत आत्महत्येच्या घटनांमुळे अवघा तालुका हादरला आहे. त्यात बुधवारी पुन्हा तालुक्यातील नरसाळा येथे एका इसमाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दिवसातील दुसरी धक्कादायक घटना बुधवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली.

महादेव तुकाराम गोवर्धन (37) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित मृतकाचे नावं आहे. प्राप्त माहितीनुसार नरसाळा येथील रहिवासी असलेले महादेव गोवर्धन यांनी विष प्राशन केल्याचे कुटूंबाना लक्षात आले. त्यांनी महादेव यांस तत्काळ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे भरती केले. मात्र उपचार दरम्यान महादेव ची प्राण ज्योत मावळली.

वृत्त लिहिपर्णत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.मृतकाच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली असा मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

 दिवसातील दुसरी घटना-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मारेगाव तालुक्यात आत्महत्येचा सपाटा चालू आहे. या घटनेमुळे तालुका हादरला आहे. सकाळीच बोरी (गदाजी) येथील राहुल वसंता सोयाम या (32) वर्षीय विवाहित युवकाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान नरसाळा येथील महादेव गोवर्धन या (37) वर्षीय विवाहित इसमानेसुद्धा विष प्राशन करून आत्महत्या केली. दिवसातील ही दुसरी घटना घडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.