पाच पानाचे दुर्मिळ बेलपत्र मिळाले

मुकुटबन येथे महालक्ष्मी पूजनाच्या दिवशीच घडला हा प्रसंग

0

सुशील ओझा, झरीः शिवोपामहालक्ष्मी पूजनाच्या दिवशीच घडला हा योगसनेत बेलाला खूप महत्त्व असतं. त्रिदल म्हणजेच तीनच पानाचा हा सेट असतो बेलपानांचा. क्वचितच तो तीनपेक्षा अधिक पांनाचा आढळतो. हा निसर्गाचा चमत्कार मुकुटबन येथे अनुभवायला मिळाला. ज्येष्ठ गौरीपूजनाच्या पर्वावर हा प्रकार पाहायला मिळाल्याने सर्वत्र कुतुहलाचा विषय झाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात गौरीपूजन किंवा महालक्ष्मीपूजन म्हणून उत्सव साजरा होत आहे. मुकुटबन येथील अखिल विलासराव बरशेट्टीवार यांच्या नात्यातील भानुदास शंकर सगर यांच्या घरी महालक्ष्मी बसविणार असल्याने पूजेकरिता ते शेतात बेलपत्र आणण्याकरिता गेलेत.

बेलाच्या झाडाच्या लहान डहाळी तोडून घरी घेऊन आलेत. बेलपत्र तोडून एका ठिकाणी जमा करीत असताना त्याला पाच पानांचे दुर्मिळ असलेले बेलपत्र आढळले. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. बेलपत्राचा उपयोग आयुर्वेदिक औषधीत विविध आजारांवरसुद्धा उपयुक्त आहे. तर देवी देवतांच्या पूजनातही मोठे स्थान आहे. या पाच पानचा विषय परिसरात खूप रंगला.

Leave A Reply

Your email address will not be published.