जब्बार चिनी, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताची कमतरता लक्षात घेता राष्ट्रहिताच्या दृष्टीने मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळ पिंपळगाव व दीपक मत्ते मित्रपरिवार तर्फे दिनांक 2 सप्टेंबर रोज सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शासकीय रक्तपेढी चंद्रपूरच्या साहाय्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात 47 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराला वणी विधानसभाक्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व माजी जि.प. सदस्य विजय पिदुरकर यांनी भेट दिली होती. या रक्तदान शिबिराचे आयोजन पिंपळगाव येथील युवक उपेश आवारी , आकाश सुर , प्रशांत आवारी ,सचिन मत्ते, सचिन पिंपळशेंडे ,विजय मत्ते राहुल मत्ते , अनिल खाडे , राकेश मत्ते , विकास क्षिरसागर , यांनी केले होते.
या शिबिराकरिता चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढीतून संजय गावित समाजसेवा अधीक्षक, जयसिंग डोंगरे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ वर्षा सोनटक्के, लक्षण नगराळे, रुपेश घुमे इत्यादी आले होते. यात गावातील युवक रोशन आवारी, गौरव खाडे, प्रशांत, आवारी, आकाश मत्ते, विजय, मत्ते, राकेश मत्ते, राहुल मत्ते यांनी सहभाग नोंदवला. मात्र काही स्वास्थसंबंधी अडचणींमुळे यांना रक्तदान करता आले नाही.
या रक्तदान शिबिरात अनेक गावांतील तथा आजूबाजूच्या गावातील युवकांनी रक्तदान केले. ज्यामध्ये दीपक मत्ते, राहुल खिरटकर, संतोष उमरे, रमेश गहुकर, निखिल खाडे, अमोल मत्ते, शुभम मत्ते, राजू मत्ते, अजय निब्रड, राकेश कायरकर, योगेश ठेंगणे, प्रकाश आवारी, अनिल खाडे, सचिन पिंपळशेंडे, एम.के वर्मा, बंडू बोंडे, अक्षय बलकी, श्रीकांत कांबळे, विशाल कोल्हे, सागर सोयाम, रवींद्र नेहारे, पवन मालेकर, भुपेंद्र बोबडे, प्रफुल वानखेडे, रविंद्र काळे, सचिन मत्ते, विकास क्षीरसागर, सचिन खटले, जयंत मत्ते, सरवींद्र मत्ते, अक्षय खिरटकर, विजेंद्र कोंगरे, रत्नाकर कायरकर, मुकेश वाघाडे, प्रमोद मादेशवार, रितीक तोडसे, आकाश दी.मत्ते, राजेश्वर कुचनकर, प्रफुल फटाले, अजय खाडे, सूरज पारशिवे, दशरथ खारकर, आकाश मडावी, सचिन वानखेडे, उपेश आवारी, आकाश सुर यांचा सहभाग होता.