आज तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण

रोजची वाढती रुग्णसंख्या ठरतये डोकेदुखी

0

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी 2 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्ट नुसार आलेले आहेत. आज आलेल्या टेस्टनुसार वणी तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 210 झाली आहे. तर तालुक्यात टेस्ट करून पॉजिटिव्ह झालेल्या रुग्णांची संख्या ही 188 आहे.

आज यवतमाळ येथे 27 स्वॅब पाठवण्यात आले. तर आज पेन्डिंग असलेले कोणतेही अहवाल आले नाही. सध्या 260 व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहे. तर आज 12 रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्यात यात 6 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आज 2 कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात टेस्ट करणा-या 188 रुग्णांपैकी 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 78 व्यक्ती पॉजिटिव्ह आहेत. यातील 41 रुग्ण कोविड केअर सेन्टरला भरती आहेत. तर 13 रुग्ण यवतमाळ जीएमसीला भरती आहे. 37 रुग्णांना होम कॉरन्टाईनची सुविधा देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.