भेटीदरम्यान सीईओ पांचाळ यांनी केले वृक्षारोपण

पंचायत समिती मारेगाव येथे आढावा बैठक संपन्न

0

नागेश रायपुरे, मारेगाव: पंचायत समिती मारेगांव अंतर्गत येत असलेल्या गावपातळीवरील कामाचा लेखाजोखा घेण्यासाठी जि.प .यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी मारेगांव पंचायत समिती ला भेट दिली. या भेटीदरम्यान प्रथम वृक्षारोपण केले व संपूर्ण कारभाराचा आढावा घेतला.

बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्याने पंचायत समितीच्या परिसरात सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वेळेत हजर होते हे विशेष. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ राळेगांव पं.स.चा दौरा आटोपून सायंकाळी 5.30 वाजता मारेगावला आलेत.

या औपचारिक आढावा बैठकीत, सीईओंनी प्रथम पंचायत समिती आवारात वृक्षारोपण केले. नंतर आढावा बैठकीला प्रारंभ केला. यामध्ये पंचायत समिती विभाग डाटा एन्ट्री झाल्या पाहिजे, लेखा आक्षेप काढावे, शोचालयाचे जे काम अपूर्ण आहेत ते काम पूर्ण करावे, एम.आर .जी इस मध्ये जो आराखडा त्यातील व नवीन जी आर प्रमाणे दोन महत्त्वाच्या बाबी समाविष्ट करावे, तालुक्यात अपंगांची नोंद कमी असल्याने त्यांच्या नोंदी नोंदवा,घरकुलाची अपूर्ण कामे पूर्ण करा,

जलजीवन अभियान ची डाटा एन्ट्री पूर्ण करा. चौदाव्या वित्त आयोगातील अखर्चीक व्याजाच्या रकमा परत करा आणि कोरोनाचा पार्श्वभूमीवर ई-पास बंद झाल्यामुळे तालुक्यात नागरिकांची ये जा भविष्यात वाढणार आहे. त्यातच मारेगाव तालुका आजच्या घडीला कोरोनाचा रुग्ण नसल्याने दक्षता घेणे गरजेचे आहे. दक्षता घेण्यासंदर्भातल्या तशा सूचना स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर कराव्यात. आदी अनेक विषयांवर सूचना देऊन काही विषयावर चर्चा करण्यात आल्यात. मुख्य कार्यकारी अधिकारी हे उशिरा आल्याने ही आढावा बैठक केवळ औपचारीक बैठक ठरली असल्याचा अनुभव उपस्थित पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांना आला.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, प्रकल्प संचालक अधिकारी राजेश कुलकर्णी, उपमुख्य पंचायत व सामान्यचे अरविंद गुडदे, उपमुख्य पा. पु. स्व.व नरेगाचे मनोज चौधरी, आरोग्य अधिकारी चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजीव खेरडे, कार्यकारी अभियंता सुरकर, मारेगावचे गटविकास अधिकारी प्रभाकर पांडे, ग्रामसेवक व पंचायत समिती कर्मचारी.उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.