रवी ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथे खर्र्यावरून वादात झालेल्या मारहाणीत एकाच्या पायाच्या मांडीचे हाड तुटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
तालुक्यातील वांजरी येथील काही युवक पत्ते खेळत बसले होते. दरम्यान शंकर घनश्याम तेलंग या ३६ वर्षीय तरुणाने गावातच असलेल्या पान टपरी चालक असलेल्या सुधीर तेलंग ३५ या चुलत भावाला खर्रा, तंबाखू मागितला होता. यात दोघात वाद झाला होता. वादामध्ये मारहाण सुद्धा झाली. त्यात सुधीरने शंकर ला ढकलून दिले तो खाली पडला आणि तिथेच पडून राहिला. त्याच्या मांडीला झाल्याने घरच्या लोकांनी तात्पुरती मालिश केली होती. हा सर्व प्रकार गुरुवारी रात्री चे सुमारास घडला.
या मारहाणीत शंकर गंभीर जखमी झाला होता. परंतू शंकर हा दारूच्या नशेत असल्याने त्याकडे इतरांनी दुर्लक्ष केले. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता चे सुमारास शंकर ला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यावेळी तो मृत असल्याची नोंद डॉक्टरांनी केली होती.
त्यानंतर डॉक्टरांनी शंकरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यात मांडीचे हाड तुटल्याने शरीरात होणारा रक्तपुरवठा थांबल्याने शंकरचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेची प्राथमिक नोंद पोलिसांनी अकस्मात मृत्यू झाला असल्याची नोंद करून तपासाला सुरुवात केली होती.
शवविच्छेदन अहवाल आल्यावरच नेमके कारण स्पष्ट होणार होते.
ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी तपास सुरू केला होता.
अखेर शवविच्छेदन अहवाल आला आणि सुधीर मोतीराम तेलंग या वांजरी येथील तरुणावर भारतीय दंड विधान कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी घटनास्थळ पंचनामा करून बयान नोंदविणे सुरू केले होते. मात्र अद्याप सुधीर ला अटक करण्यात आली नव्हती. वादात ढकलून दिल्याने शंकर खाली पडला पण त्याच्या पायाचे मुख्य हाड तुटले त्यातच त्याचा मृत्यू झाला.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post