सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निमनी गावात एका अल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहे.
निमनी येथील अल्पवयीन मुलगी आई घर सोडून गेल्यामुळे तिचे वडील व भावासोबत राहते. वडील शेती करून कुटुंबाचे पालन पोषण करतात. 15 सप्टेंबरच्या सायंकाळी लाईट गेली होती. त्यामुळे मुलींच्या वडिलांनी बॅटरीचा लाईट लावला व जेवण केले. जेवण केल्यानंतर मुलगी खाट टाकून झोपली होती. तिच्या बाजूलाच दुसऱ्या खाटेवर वडील व भाऊ झोपले होत.
रात्री १२.३० वाजता दरम्यान गावातीलच समीर मरापे (22) हा वाईट उद्देशाने आला. त्याने झोपलेल्या मुलीचा हात पकडताच मुलगी दचकुन जागी झाली. तिने आरडाओरड सुरू केला. मुलीने आवाज करताच समीर हा पळून गेला. बॅटरीचा उजेड सुरू असल्याने समीर याचा चेहरा दिसला.
सकाळी घडलेली हकीकत पीडित मुलीने व तिच्या वडिलांनी पोलीस पाटील यांना सांगितली. मुकुटबन पोलीस स्टेशनला वडीलांसोबत येऊन मुलीने तक्रार नोंदविली. यावरून पोलिसांनी आरोपी सुरेश मरापे याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायदा व विनयभंगाची कलम ३५४, ३५४ (डी)(१) नुसार गुन्हा दाखल केला.
आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनूने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व राम गडदे करीत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)