वणी बहुगुणी बुलेटीन: 18 सप्टेंबर
जाणून घ्या वणी, मारेगाव, झरी तालुक्यात दिवसभरात काय घडले?
आज दिवसभरात…. अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन…
तालुक्यातील रुग्णसंख्येने पार केला 500 चा आकडा
जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी तालुक्यातील रुग्णसंख्य़ेने 500 चा आकडा क्रॉस केला. आज कोरोनाचे 10 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 3 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 503 झाली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरात 8 रुग्ण आढळून आले आहेत. यात जैताई मंदिर परिसर व विराणी टॉकिज परिसरात प्रत्येकी 2 तर सिंधी कॉलनी, विठ्ठलवाडी, रजानगर, सरोदे चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहे. तर 2 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. यात ब्राह्मणी येथील 1 चिखलगाव येथे 1 रुग्ण आहेत.
विनयभंग करणा-या आरोपीस कोर्टाची शिक्षा
सुशील ओझा, झरी: विनयभंग केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी के.जी.मेंढे यांनी आरोपी नामदेव पोचीराम भोकरे यास भादंविचे कलम ३५२ अंतर्गत ५००.रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत हजर राहणे अशी शिक्षा दी. १६ सप्टेंबर २०२० रोजी सुनावली. तालुक्यातील पोलीस स्टेशन मुकुटबन अंतर्गत येणाऱ्या गावातील फिर्यादी लोकप्रतिनिधी होती. २६ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रामसभा आयोजीत केली होती. या ग्रामसभेत आरोपी हा दारु पिऊन फिर्यादी महिलेसोबत वाद करुन हात पकडून ओढले. बांगड्या तोडल्यात व धक्काबुक्की केली होती.
मारेगाव येथील सेतू केंद्रात शिरला साप
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील तहसिल कार्यालयातील सेतू सेवा केंद्रात आज शुक्रवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. सापाची लांबी बघून अनेकांना घाम फुटला. अखेर या सापाला वणी येथील प्रसिद्ध सर्पमित्र हरीष कापसे यांनी पकडून जीवदान दिले. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास सेतू केंद्राचे कर्मचारी स्वप्नील सातपुते व आशिष पेचे हे नेहमी प्रमाणे तहसिल कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी सेतू केंद्राच्या कार्यालयाचा दरवाजा उघडला. मात्र त्यांना समोर एक 6 फुटांचा साप दिसला होता.
उकणीतील तरुणाने पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेतल्याचा संशय
जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास पाटाळाच्या पुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर तरुणाचा मोबाईल व बाईक पुलावर आढळून आला आहे. मोबाईलवरून माहिती काढली असता बेपत्ता झालेला तरुण उकणी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू असून अद्याप तिथे कुणाचाही शोध लागलेला नाही.
वणीत दुसरे शासकीय कोविड केअर सेंटर करण्याची मागणी
विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परसोडा येथे तालुक्यातील कोविड केअर सेंटर आहे. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वणी येथे पुन्हा एक नवीन कोविड सेंटर सुरू करावे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी आज शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले,