मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धाड
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर लाखोंचा माल जप्त
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यापासून सतरा किमी अंतरावर असलेल्या वनोजदेवी लाखापुर शिवारात अवैद्य दारु विकत असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्या आधारावर पोलिसांनी धाड़ टाकून प्रमोद गेडाम याला ताब्यात घेतले. त्याकडून देशी दारुसह मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. हा सर्व मुद्देमाल 1 लाख 13हजार रुपयांचा आहे.
पोलीस सूत्रानुसार तालुक्यात दहा दिवसांपासून गणेश उसत्व सुरु होते. विसर्जनाच्या दरम्यान देशी दारू व बार बंद असल्याचा फायदा घेत वनोज देवी लखापुर परिसरात प्रमोद गेडाम हा अवैद्य दारु विकत असल्याची माहिती पोलिसांना लागली. पेट्रोलिंगच्या दरम्यान आरोपी जवळ प्लास्टिकच्या थैलीमध्ये 432 देशी दारुचे बॉटल, ज्याची किंमत 25,900 आहे. सोबतच यामाहा कंपनीची मोटरसायकल गाडी जप्त करण्यात आलीये.
याच परिसरात दिनांक 3 सप्टेम्बर रोजी 120 बॉटल ज्याची किंमत 7200 रुपये आहे. या दोन्ही धाडीत एकूण 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडून आरोपीला ताब्यात घेतले आहे
या घटनेचा तपास मारेगाव चे ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज बोडलकर, लक्ष्मण गोडेकर, विजय कुड़मेथे, शशी वानखेड़े तपास करीत आहे.