विवेक तोटेवार, वणी: भाजी मार्केटमध्ये नगर परिषदेसमोर ठेवलेली दुचाकी चोरीला गेली. रविवारी 6 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. याबाबत आज सोमवारी तक्रार देण्यात आली आहे. सदर व्यक्ती ही भाजीपाला घेण्याकरिता वणीत आली होती. तक्रारीवरून वणी पोलिसांनी कलम 379 नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
सचिन रामदास गायधने (33) असे दुचाकी मालकाचे नाव आहे. त्यांनी ही दुचाकी 2018 मध्ये खरेदी केली होती. सचिन हे शिवणी (साखरा) येथील रहिवासी आहे. ते 6 सप्टेंबर रोजी रविवारी वणीत भाजीपाला व काही सामान घेण्याकरिता आले होते. 4.30 वाजताच्या दरम्यान त्यांनी आपली दुचाकी (MH34 BM6128) नगर परिषद कार्यालयासमोर उभी केली. परंतु ते चावी काढायला विसरले.
याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला व त्यांची दुचाकी घेऊन चोरटा पसार झाला. 5 वाजता सचिनने येऊन बघितले असता दुचाकी दिसली नाही. दुचाकी न दिसल्याने त्यांनी इतरत्र शोध घेतला परंतु गाडी मिळाली नाही. त्याच दिवशी ते गावी परतले.
सोमवारी 21 सप्टेंबर रोजी त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 379 नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेचा तपास गोपाल उटणे करीत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)