सुशील ओझा, झरी: तालुक्यात खनिज विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम येदलापूर येथे सुरू करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी येदलापूर शाळेत ६ ब्रास अवैध रेतीसाठा केल्याची माहिती मिळताच पटवारीने रेती जप्त केली. पोलीस पाटील यांना सुपूर्तनाम्यावर दिली.
परंतु सदर रेती चोरटा व ठेकेदारावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यावरून शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुगुल यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी तक्रार करून वॉलकंपाउंड करणाऱ्या ठेकेदार यांच्यावर तसेच रेती चोरी करून साठा करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करावी अशी तक्रार केली आहे.
वॉल कंपाउंडकरिता अवैध रेती जप्ती करण्यात आल्यानंतर तहसीलदार यांनी १३ सप्टेंबर रोज मुख्याध्यापक, पोलीस पाटील व सुरेश मानकर यांना उलट तपासणी करिता पत्र देऊन त्यांचे बयाण नोंदविले आहे. तरी या प्रकरणात कुणावर कार्यवाही होते व कोण राजकीय बळाचा वापर करतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)