विवेक तोटेवार, वणी: वणीतून नेर येथे पिकअप वाहनाने कत्तलीसाठी घेऊन जाणा-या 19 म्हैस व रेड्यांची वणी पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी चार वाहने जप्त करण्यात आली असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुमारे 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी ही कार्यवाही करण्यात आली
वणीतील खरबडा परिसर येथून म्हैस व रेड्यांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सतीघाट-घोन्सा रोडवर सापळा रचला. दुपारी 4 वाजताच्या सुमारास तिथे चार पिकअप वाहने आलीत. या वाहनांची तपासणी केली असता त्यात 19 म्हैस व रेडे निर्दयीपणे कोंबण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी विचारणा केली असता कोंबलेले जनावरं नेर येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.
या प्रकरणी पोलिसांनी 4 पिअ अप वाहने जप्त केली. तर पाच आरोपींना अटक करण्यात आली. मारोती गंगाराम दुर्गमवार (32) रा. खरबडा, राजू मधुकर झिलपे (28) रा. रंगनाथ नगर, किशोर अशोक मुळे (30) रा. गोकुळनगर, सय्यद रोशन अली (50) रंगनाथ नगर, तहसीन खान तशावर खान (50) रा. शास्त्री नगर असे आरोपींचे नावं आहेत. त्यांच्याकडून चार पिकअप वाहने ज्याची अंदाजे किंमत 18 लाख रुपये. 19 म्हैस व रेडा किंमत 3 लाख 80 हजार रुपये असा एकूण 21 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्व आरोपींवर प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम 11 (1) ए डी व झेड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वात व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, इकबाल शेख, संतोष कालवेलवार, अशोक दरेकर यांनी केली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)