येदलापूर येथील कंत्राटदाराला 92 हजारांचा दंड

बांधकामासाठी अवैधरित्या रेतीसाठा करणे पडले महागात

0

सुशील ओझा, झरी: जिल्हा परिषदेच्या बांधकामासाठी अवैधरित्या रेतीसाठा केल्याप्रकरणी येदलापूर येथील कंत्राटदाराला 92 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कार्यवाही तहसिलदार झरी यांनी केली आहे. या अवैध रेतीसाठयाबाबत शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विश्वास नादेंकर यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुगुल यांनी वारिष्ठांकडे तक्रार करण्यात आली होती.

तालुक्यातील येदलापूर येथे खनिज विकास निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करिता कंत्राटदाराने 6 ब्रास अवैध रेतीसाठा केला होता. याबाबतची माहिती मिळताच महसूल विभागाने रेतीसाठा जप्त केला व पोलीस पाटील यांच्या सुपूर्त केला होता. या प्रकऱणी संबंधीत पोलीस पाटील, मुख्याध्यापक व सुरेश मानकर यांच्यासह कंत्राटदार यांचे बयाण घेण्यात आले होते.

या रेतीसाठ्याबाबत कंत्राटदाराकडून समर्पक उत्तर न मिळाल्याने अखेर तहसिलदार गिरीश जोशी यांनी कंत्राटदारावर 92 हजारांचा रुपये दंड ठोठावला आहे. तसेच साठवणूक केलेली सहा ब्रास रेती देखील जप्त केली आहे. जर रेती परत घ्यायची असेल तर 18 हजार भरून ती परत घ्यावी लागेल असाही निर्णय दिला.

येदलापूर शाळेच्या वॉलकंपाउंडच्या कामात रेती ऐवजी काळी चुरीचा वापर करून नित्कृष्ट बांधकाम होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. बांधकामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुगुल व दयाकर गेडाम यांनी केली आहे.

शाळा वॉलकंपाउंड, सिमेंट रस्ते व इतर कामात तालुक्यातील एक राजकीय पुढारी मोठ्या प्रमाणात रेतीचोरी करून रेतीसाठा करत असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. याबाबतची माहिती सर्वांना माहिती असूनही केवळ राजकीय बळ मिळत असल्याने या पुढा-याचा धंदा चांगलाच सुरू असल्याचा आरोप होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.