विवेक तोटेवार, वणी: बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास यवतमाळ रोडवरील अनिस हॉल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या चमूने धाड टाकली. काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. येथून 7 जुगाऱ्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे.
अनिस हॉल येथे रुम नंबर 114 मध्ये जुगार सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाली. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत. त्यानुसार रात्री 10 वाजताच्या सुमारास अनिस हॉल येथे धाड टाकण्यात आली. येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याचे दिसून आलेत.
यामध्ये रोहित गुरुमुख केशवानी (28) रा. सिंधी कॉलनी, मनीष नंदकिशोर फेरवानी (25) रा.सिंधी कॉलनी, जयकी सुभाष तरुणा (22) रा. सिंधी कॉलनी, विजय मनोहर नागदेव (30) रा. सिंधी कॉलनी, संदीप संतोष केशवानी (30) रा. सिंधी कॉलनी, यश श्रीचंद्र फेरवानी (30) रा. सिंधी कॉलनी व राहुल गोपी आहुजा यांना अटक करण्यात आली.
यांच्याकडून नगदी व पत्ते असे 8,950 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कलम 4,5 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वानखेडे, इकबाल शेख, प्रदीप ठाकरे, अशोक दरेकर, संतोष कालवेलवार यांनी केली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)