जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 9 व्यक्ती आरटी-पीसीआर टेस्टनुसार तर 5 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 635 झाली आहे.
आज यवतमाळहून 26 अहवाल प्राप्त झाले. यात 9 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 17 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 52 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात एकूण 634 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 516 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 102 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 15 झाली आहे.
आज 14 रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत. आज वणी शहरात 8 रुग्ण आढळून आले आहेत. यात संजीवनी चौक, विठ्ठल वाडी, फुकटवाडी, पद्मावती नगरी, ढमाले नगर, विराणी टॉकीज, चिंडालिया कॉम्प्लेक्स व इतर याठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात 6 रुग्ण आढळून आले आहेत यात चिखलगाव येथे 2 तर कुंभारखनी, ब्राह्मणी, भालर, मांजरी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.
आज 24 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 24 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 102 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 47 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 55 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 22 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 55 व्यक्ती भरती आहेत.