झरी परिसरात पसरली घाण

अनेक तक्रारी; पण समस्या प्रलंबितच

0

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत अंतर्गत शहरात व परिसरात संपूर्ण घाण पसरली आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. नगरपंचायत अंतर्गत होणाऱ्या चुकीच्या कामांकरिता स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यात. तरीही अनेक समस्या अजूनही प्रलंबित आहेत.

Podar School 2025

नगरपंचायत अंतर्गत कचरा साफसफाईकरिता कॉन्ट्रॅक्ट दिला होता. कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डात व शहरात कचरागाडी घेऊन साफसफाई केली जायची. सदर काँट्रॅक्टरचा काँट्रॅक्ट एका आठवड्यापूर्वी संपला. त्यामुळे एका आठवड्यापासून शहरात व वॉर्डातील साफसफाई व कचरा गाडी बंद झाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बसस्टँड, शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जमा झालेत. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी डबकी साचलीत. नाल्यांमध्ये कचरा जमा झाला आहे. रस्त्यांवरुन पाणी वाहत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डास यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर कचरा सडून दुर्गंधी सुटली आहे. पाण्याचे डबके, सडलेला कचरा, रस्त्यांवरून वाहणारे पाणी व इतर समस्यांमुळे एकूण १८०० लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. नगरपंचायतीने उपाययोजना करून गावातील कचरा, नाल्या व रस्त्यांवरील वाहणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावावी. जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवावे अशी मागणी स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.