जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले सर्व रुग्ण हे आरटी-पीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. यातील 4 रुग्ण चिखलगाव येथील तर 1 रुग्ण मजरा यागावातील आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 647 झाली आहे. दरम्यान आज शहरातील तेली फैल येथे तयार करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
आज यवतमाळहून 16 अहवाल प्राप्त झाले. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 15 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज कोणत्याही संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले नाही. अद्याप 33 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात एकूण 647 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 543 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 87 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 15 झाली आहे.
आज 20 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 20 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 87 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 37 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 50 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 20 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 40 व्यक्ती भरती आहेत.
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे आज झाले उद्घाटन
शहरातील लोढा हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आलेल्या डेडिकेडेट कोविड हॉस्पिटलचे मंगळवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी जनरल वार्ड आणि सेपरेट रूम अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बेडला ऑक्सिजन व्हेंटीलेटरची सुविधा तसेच गंभीर रुग्णांसाठी आयसीयू, सीटीस्कॅनसारखी सुविधाही दिली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य कोरोना रुग्णासह पॉजिटिव्ह असलेल्या गर्भवती महिला, अपघात झालेले पॉजिटिव्ह व्यक्ती, पॉजिटिव्ह असलेले नवजात बाळ, शस्त्रक्रिया तसेच इतर गंभीर आजारांवरील रुग्णांवर उपचार केला जाणार आहे. वणी व नागपूर येथील डॉक्टरांची टीम कोरोना रुग्णांना सेवा देणार आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)