शिक्षकांच्या खांद्यावर आरोग्य सर्व्हेक्षणाची बंदूक !

विमाकवच नसल्याने शिक्षकांत संताप

0

तालुका प्रतिनिधी, वणी: ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत खासगी शिक्षकांना आरोग्य सर्व्हेक्षणाची कामे दिलीत. दरम्यान शिक्षकांना घरोघरी भेटी देऊन प्रत्येकाचे ऑक्सिजन व तापमान स्तर तपासणीचे कामे करावी लागत आहेत. यात अन्य कर्मचाऱ्यांसारखी विमाकवचाची तरतूद शिक्षकांसाठी करण्यात आली नाही. परिणामी शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

वणी तालुक्यातील शहरांस ह ग्रामीण भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना सुरू आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत काही आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांनी अल्पमानधनात काम करण्यास नकार दिला. परिणामी आरोग्यविभागाने सर्व्हेक्षणाची कामे खासगी शिक्षकांवर सोपवलीत.

खासगी शिक्षक घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीचे कामे करीत आहेत. मात्र सदर जबाबदारी पार पाडण्यासाठी सुरक्षेची योग्य साधने पुरविण्यात आली नाहीत. केवळ नाममात्र एक, दीड लिटर सॅनिटायझर देण्यात आले. असा शिक्षकांचा आरोप आहेत. सर्व्हेक्षण करणाऱ्या शिक्षकांना सर्व्हेक्षण करताना कुटुंबातील सदस्य अथवा आजारांबद्दल खरी माहिती देत नाही.

आजार असूनही अनेकजण विलगिकरणाच्या भीतीपोटी आजार लपवत आहेत. कोरोना संशयित असलेल्या काही परिसरात ‘कोरोना प्रतिबंधित क्षेत्र’ फलक नसल्याने काही ठिकाणी गोंधळ निर्माण होत आहे. नकळतपणे अशा घरी सर्व्हेक्षण कर्मचारी माहिती घेण्यासाठी जातात. विशेष म्हणजे कोविड -१९ च्या काळात आरोग्य कर्मचारी आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमाकवच देण्यात आले. मात्र अशी तरतूद शिक्षकांसाठी नाही.

परिणामी एखाद्या शिक्षकाला सर्व्हेक्षनादरम्यान कोरोनाचा संसर्ग होऊन दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत.

गेला फळा, गेला खडू…. हाती काम आले कडू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. शिक्षकांच्या हाती खडूही नाही आणि फळाही नाही. ज्ञानदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांसाठी हे काम जणू ‘कडू’च आहे. ‘भलत्याच’ कामात शिक्षकवृंद लागला आहे. या सर्वेक्षणाच्या कार्यात त्यांना पुरेसं आवश्यक संरक्षण नसल्याचंही म्हटलं जात आहे. शिक्षणासारख्या गोड कार्यातल्या या ज्ञानदात्यांना हे ‘कडू’ कार्य करावं लागत आहे. जवळपास सर्वच शिक्षकांची ही बोलकी अथवा अबोल खंत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.