गांधीजयंतीला कॉंग्रेसची विविध प्रश्नांवर निदर्शने
माजी आमदारांसह नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग
विवेक तोटेवार, वणी: गांधीजयंतीच्या पर्वावर वणी तालुका युवक कॉंग्रेस कमिटीने विविध प्रश्नांना धरून निदर्शने केलीत. यात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. नवे कृषिकायदे रद्द व्हावेत. हाथरस प्रकरणात आरोपींना कठोर दंड व्हावा. उत्तरप्रदेशात राहुल गांधीना झालेल्या धक्काबुक्कीच निषेध करीत वणीच्या तहसीलदारामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना तसे निवेदन पाठवले.
नवीन कृषिकायद्यांनुसार बाजार समितीतून लाखो रोजगार उपलब्ध होत आहेत. ही पथ्दती बंद केल्यास देशभरातील लाखो वाहतुकदार, श्रमिक बेरोजगार होण्याच्या धोका आहे. बाजार समिती बंद केल्या तर शेतकऱ्यांना मोठ्या कंपन्यांच्या निर्णयानुसार मालाचा भाव स्वीकारावा लागेल. जो मोबदला मिळेल तो कंपन्यांच्या गरजेनुसार कमी जास्त स्वरुपात असेल. तो शेतकऱ्यांसाठी अन्याय कारक राहील. हा मोबदला अनेक घटकांवर अवल्रंबून राहील. ज्यांच्यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण नसेल.
शेतकऱ्याला बाहेर माल विकल्यास मिळणारे मूल्य हे आधारभूत मूल्यापेक्षा कमी नसावे अशी तरतुद विधेयकात नाही. ठेकेदारी पध्दती नियंत्रण कायद्यानुसार ठेकेदारी पध्दतील वादांचे निर्मूलन सरकारी अधिकारांच्या अखत्यारीत राहतील. त्यामुळे अल्पभूधारक सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे.
अत्यावश्यक वस्तु कायद्यातील दुरुस्तीमुळे व्यापारीवर्ग गरजेपक्षाही जास्त प्रमाणात मालाचा साठा करु शकतात. ज्यासाठी त्यांना कुठल्याही शिक्षेची तरतूद नाही. या साठीबाजीमुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ पोहचेल. देश भरातील शेतकरी विरोधात गेले आहेत. त्यामुळे वणी तालुका युवक कॉैग्रेस कमिटीने निषेध व्यक्त केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
माजाी आमदार वामनराव कासावार, देविदास काळे, विवेक मांडवकर, मोरेश्वर पावडे, प्रमोद निकुरे, ओम ठाकूर, भास्कर गोरे, सुनील वरारकर, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, आशीष खुलसंगे, अशोक नागभीडकर, प्रमोद लोणारे, रफिक रंगरेज, बाबाराव चौधरी, विकेश पानघाटे, जगदीश चौधरी, डॅनी सॅन्ड्रावार, संजय खाडे, सुरेश बन्सोड, भैय्या बदखल, लक्ष्मण पोंनलवर, वंदना धगडी, संध्या रामगीरवार, प्रदीप खेकारे, ज्ञानेश्वर येसेकर तसेच काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी निदर्शनात सहभाग घेतला.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)