नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी जास्त होत असली तरी, भीती मात्र कायम आहे. आरोग्यविभागाला शुक्रवारी 2 ऑक्टोबरला प्राप्त झालेल्या अहवालात मारेगाव येथे 3 तर मार्डी येथे 1 कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला.
प्रशासनाने 31 रिपोर्ट पाठविले होते. त्यापैकी 4 पॉझिटिव्ह तर 27 निगेटिव्ह रिपोर्ट आले असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये चार पोलीस कर्मचारी तसेच एक होमगार्ड हे कोरोनाने बाधित झालेत. शुक्रवारी आलेल्या अहवालात पोलीस स्टेशनमधील पुन्हा दोन महिला व एक पुरुष बाधित झालेत. सोबतच मार्डी येथे एक पुरुष बाधित झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींची नावे ट्रेस करणे सुरू आहे. प्रशासनाकडून सांगितलेल्या नियम व अटींचे पालन करावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)