नागेश रायपुरे, मारेगाव: महामार्गावरील अपघाताला आळा घालण्यासाठी नागपूर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. करंजी वाहतूक पोलीस विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हायवेवरील केळापूर टोल नाका येथे हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी महामार्ग पोलीस केंद्र, करंजीचे पो.नि. संदीप मुपडे व पो.उप.नि. विनोद कुमार तिवारी यांनी वाहन चालक व त्यांचे सहकारी यांची सभा घेवून त्यांना वाहतूक बाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. सहायक अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) मुंबईचे डॉ. भुषण कुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आलाये.
रात्रीच्या वेळेला वाहन धोकादायकरित्या कोठेही पार्क करु नये, रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभे असलेल्या वाहनांना अपघात टाळण्यासाठी परावर्तक आणि पार्किंग लाईट व इतर सावधगिरी बाळगावी. वाहन चालवितांना धोकादायकरित्या किंवा चुकीच्या साईडने ओव्हरटेक करू नये. वाहन चालकाने वाहन चालवितांना लेन शिस्त तसेच वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे.
वाहने चालविताना नशा पाणी करु नये. मोटारसायकल चालविताना हेल्मेट लावून वाहन चालवावे, अशा सूचना वाहन चालकांना करण्यात आल्या. याशिवाय लहान मुलांना पेटोल टँक वर बसवू नये त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत अशा सूचनाही वाहनचालकांना करण्यात आल्या.
ज्या वाहनास रिफ्लेक्टर नाहीत अशा वाहनांना रिफ्लेक्टरसुद्धा महामार्ग पोलीस केंद्र करंजीच्या वतीने लावण्यात आले. या ठिकाणी नेहमीच्या ट्रक मुळे मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे पडलेले होते ते सुद्धा महामार्ग पोलीस केंद्र करंजीच्या वतीने पाठपुरावा करून तात्पुरते बुजून घेतलेले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)