महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
दुर्भा व मांडवी येथे वाहिली महामानवांना आदरांजली
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुर्भा व मांडवी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर सरपंच सतीश नाकले यांनी प्रकाश टाकला. देशाकरिता जीवनात केलेल्या केलेल्या कार्याबद्दल संपूर्ण माहिती ग्रामवासीयांना दिली. या महामानवांना उपस्थितांना आदरांजली वाहिली.
महात्मा गांधी यांनी उभारलेल्या स्वदेशी चळवळीवर मान्यवरांनी भाष्य केले. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या शिस्त आणि काटेकोरपणावर विचार मांडलेत. देशाच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील या महामानवांचं स्थान किती मोठं आहे यावर चर्चा झाली. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्यात आले. अत्यंत साध्या पद्धतीने हा जयंतीचा उत्सव साजरा झाला.
अशाच पद्धतीने मांडवी येथील ग्रामपंचायती मध्ये पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य मिळून दोन्ही महामानवांची जयंती साजरी केली. कार्यक्रमात सरपंच सतीश नाकले, नरसिंगू मारशेट्टिवार, बालाजी सिडाम, सुभाष भेदोडकर, नितीन नाकले, विकास अडपावार, अंकुश नंनुरवार, गजानन राखुंडे, शंकर गेडाम यांच्यासह ग्रामवासी उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)