विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बोर्डा येथील रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्याचा सोमवार 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मृत्यूचे कारण अस्पष्ट असले तरी फावरणीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
कैलास रघुनाथ मडावी (38) रा. बोर्डा असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना सोमवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अवघ्या 1 तासातच त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूचे कारण अजूनही समजू शकले नाही. मात्र गेल्या 8 दिवसांपासून ते शेतात कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याची माहिती आहे. या फावरणीतून त्यांना विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज निकटवर्तीयांकडून लावला जात आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)