” येथे गरम जेवण मिळेल’.. आता हॉटेलात बसून करा जेवण
50 टक्के ग्राहकांसह बसून जेवण्याची परवानगी
जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या सहा महिन्यांपासून घरात बसून राहिलेल्या वणीकर खवय्यांना, कुटुंबांना आता हॉटेलात जेवणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारपासून हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. यासह नाश्ता सेंटर, हॉटेल, रेस्टॉरंटच्या बाहेर लावण्यात आलेल्या “फक्त पार्सल सुविधा उपलब्ध” ची पाट्या एका कोपऱ्यात फेकण्यात आली. तर “येथे गरम जेवण मिळेल” व जेवण तयार आहे” चे बोर्ड एकदा पुन्हा हॉटेल, रेस्टॉरंट च्या बाहेर झलकायलं लागले आहे. मात्रा जिल्हाधिकारी यांचे आदेश अद्यापही प्राप्त न झाल्याने रेस्टॉरंटचालक सध्या धाकधुकीतच आपला व्यवसाय चालवत आहे. हीच परिस्थिती बार चालकांची देखील आहे.
वणी शहर क्षेत्रात छोटी मोठी शंभरहून अधिक व्हेज-नानव्हेज हॉटेल्स आहे. ढाब्यांची संख्या तीसच्या जवळपास आहे. तर तब्बल पंचावन्नहुन अधिक बार अँड रेस्टॉरंट आहे. लॉकडाउनमुळे गेल्या मार्च महिन्यापासून सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळी व बारला कुलूप लागून होते. जुलै महिन्यात राज्य शासनाने कडक निर्बंधासह हॉटेल व रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी दिली. त्यात हॉटेल व लॉजमध्ये 33 टक्के ग्राहक तर रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना पार्सल देता येणार अशी अट लागू केली होती. बारमध्ये ग्राहकांना जेवणावर बंदी घालण्यात आली होती. आता रेस्टॉरंटमध्ये जरी बसून जेवणाची परवानगी देण्यात आली. तरी हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना नियमांची काटेकोर पालन करणे अवघड होणार आहे.
“लंच” करता येणार, मग “डिनर”चं काय?
राज्य शासनाने दिलेल्या परवानगीनुसार हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये आसन क्षमतेच्या 50 टक्के ग्राहक बसविता येणार आहे. प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना हाथ सॅनिटायझ व मास्क लावणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने एकमेकापासून 3 फिट अंतरावर बसायचे आहे. मग कुटुंब असेल तर काय करायचे ? हॉटेलमध्ये दुपारचा जेवण (लंच) करणाऱ्यांची संख्या 30 टक्के तर रात्री जेवण (डिनर) 70 टक्के असतात. डिनर करणारे ग्राहक सरासरी रात्री 8 वाजता नंतर येत असतं. पण शासन नियमानुसार सायंकाळी 7 वाजता रेस्टॉरंट बंद करावयाचा आहे. तर मग 30 टक्के ग्राहकांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट चालविणे परवडणार का ? असाही प्रश्न हॉटेल चालकांपुढे उपस्थित झाला आहे.
हॉटेलच्या जेवणाचा आस्वादच निराळा असतो. घरचं जेवण करून ही हॉटेलमध्ये गेल्याशिवाय चैन पडत नाही. आठवड्यातुन एकदा तर बाहेरच्या जेवणावर ताव मारावे अशी आमची इच्छा असते. हॉटेलमधल्या विविध रंगाच्या डिश, थाळीची सजावट, मसाल्यांची सुवास आणि चमचमीत जेवण पाहून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्यातच मांसाहारी जेवण करणाऱ्यांची तर मज्जा वेगळीच असते.
हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप नवीन नियमावली प्राप्त झालेली नाही. आदेश मिळताच या बाबत कळविण्यात येईल.
: डॉ.शरद जावळे, उप विभागीय अधिकारी, वणी