विलास ताजने, वणी: तालुक्यातील येनक येथील एका शेतात (दि.9) शुक्रवारी सकाळी मोठा अजगर आढळला. सदर माहिती शेतकऱ्याने सर्पमित्राला दिली. सर्पमित्राने अजगराला पकडून कुर्लीच्या जंगलात सोडले. सर्पमित्र अतिश शेंडे यांच्यामुळे अजगर प्रजातीच्या सर्पमित्राला जीवदान मिळाले. परतीच्या पावसाने सर्वत्र ओल पसरली आहे. त्यामुळे परिसरात असे जीव बाहेर येत आहेत.
वणी तालुक्यातील येनक येथील शेतकरी भास्कर थेरे यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी भला मोठा अजगर दिसून आला. सदर माहिती शेतमालकाने येनक येथील सर्पमित्र अतिश शेंडे यांना दिली. सर्पमित्राने शिताफीने अजगराला पकडले. लगतच्या कुर्ली बीटच्या शेवाळा जंगलात सोडले. यावेळी वनरक्षक दिनेश पाचभाई, वनचौकीदार हजर होते. सध्याच्या काळात शेतकऱ्यांनीदेखील अत्यंत दक्षतेने शेतात काम केले पाहिजे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)