रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता

शिरपूर मेंढोली रस्त्याची 'वाट' लागली

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: ओव्हरलोड वाहतुकीमुळे शिरपूर-मेंढोली व मेंढोली 18 नंबर पूल या रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

शिरपूर मेंढोली हा 6 किलोमीटर व मेंढोली ते 18 नंबर पूल हा 4 किलोमीटरचा रस्ता. या रस्त्याची जडवाहतुकीची क्षमता नसताना रोज राजरोसपणे मोहदा येथून कायरकडे जाणारे गिट्टी, मुरूम आणि गडचांदूर आणि कोरपना येथून येणारी सिमेंटची वाहने या रस्त्याने ओव्हरलोड वाहतूक करताना दिसत आहेत.

परिणामी हा रस्ता पूर्णपणे दबला. मोठे मोठे खड्डे पडलेत. ऑस्टोलीयन बाभळीची झुडपे रस्त्यांवर आहेत. खराब रस्त्यामुळे मोठे अपघात होत नसलेत तरी मोटरसायकलस्वारांचे छोटे अपघात होतच राहतात. दरम्यान वणी-मुकुटबन ह्या रस्त्याचे काम सुरू असून त्या रस्त्याला लागणारी गिट्टी व मुरूम हे साहित्य याच मार्गाने पुरविले जाते.

माणिकगड व गाडचांदूर येथून येणारी वणीकडे जाणारी अवजड वाहने वणी येथील टोल वाचविण्यासाठी याच मार्गाने वाहतूक करतात. ग्रामीण भागातील वाहतूक करण्यासाठी हा रस्ता सुलभ असताना अधिक वजनामुळे दोन्ही रस्त्यांची वाट लागली आहे.

या रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे. या रस्त्यांची अवजड वाहतूक त्वरीत बंद करुन उखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी प्रवासी व गावकरी करीत आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.