राज्य शासनाच्या निर्णयामुळे ‘उमेद’च्या महिला ‘ना उमेद’
वणीत 'उमेद'च्या महिलांचा खाजगीकरण विरोधात मूक मोर्चा
जितेंद्र कोठारी, वणी: ‘उमेद’ अभियानातील महिलांनी विविध मागणींसाठी आज सोमवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी वणीत मूक मोर्चा काढला. यावेळी वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. हाताला काळ्या फिती बांधून तसेच काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून महिलांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.
कार्यमुक्त कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे कामावर घेणे, गरिबी निर्मूलनच्या कामास प्राधान्य देणे, कॅडर मानधन, गट व ग्रामसंघ अनुदान रिक्तपदे त्वरीत भरणे इ मागण्या आंदोलकांच्या आहेत. टिळक चौक येथे दुपारी वणी उपविभागातील महिला एकत्र आल्या. ‘उमेदला न्याय द्या’ ‘ महिलांचा हक्क- उमेद फक्त’ असे घोषणाफलक घेऊन महिलांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.
वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आंदोलन स्थळी भेट देत महिलांशी चर्चा केली. त्यांनी महिलांचा मागण्यां बाबत विधानसभेत प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकार्त्यांतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
गरीब व वंचित महिलांचे स्वयंसहायता समुह स्थापन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्देशाने 2013 मध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद) सुरू केले होते. वर्तमान आघाडी सरकारने हे अभियान शासकीय पातळीवर बंद करून खासगी संस्थेकडे सोपविण्याची हालचाली सुरू केल्या आहे. शासनाच्या ह्या निर्णयाविराधात वणी उपविभागातील महिला बचत गट आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद) अभियानात राज्य भरातील जवळपास 5 लक्ष बचत गट, ग्रामसंघ व प्रभाग संघ जोडून आहे. उमेद अभियानात 5 हजार समर्पित कर्मचारी व तब्बल 50 लाखापेक्षा जास्त महिला काम करीत आहे. उमेद अंतर्गत हजारो महिला स्वतःची तसेच बचत गटाच्या माध्यमातून विविध उत्पादन व व्यवसाय करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. महिलांच्या प्रगतीला नवी दिशा मिळण्या ऐवजी शिवसेना, राकापा व कांग्रेस सरकार या अभियानाच्या मुळावर घाव घालण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी नूतनीकरण करार अंतर्गत करार संपलेले 450 कर्मचाऱ्यांना मागील महिन्याभर पासून ताटकळत ठेवले आहे, असा आरोप बचत गटांतर्फे आहे.
काय आहे “उमेद”?
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात रुपांतर करण्यात आलेले आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद) हे अभियान राबविण्या त येत आहे. वंचित कुटुंबांना अर्थिक व समाजिक दृष्टीया सक्षम करणे, तसेच स्व विकास ते गाव विकास या संकल्पकनेतून गावातील विविध प्रश्नव सोडविण्याससाठी ग्रामसंघाची स्थापना केली जाते. ग्रामीण भागात गावपातळीवर विविध समुदाय संसाधन व्यकक्ती मार्फत कामे केली जातात. समुदाय संसाधन व्याक्ती मार्फत स्वयंसहायता गटांना विविध सेवा पुरवण्यासाठी आर्थिक साक्षरता सखी, MIP सखी, बॅक सखी, कृषी सखी, पशुसखी इत्यावदीची निवड करण्यात येते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)