‘दार उघड देवा! दार उघड!’ – धर्मजागरण समन्वय संस्कृती विभाग

मंदिरे उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

विवेक तोटेवार, वणी: राज्यात हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. बाजार, दुकाने यांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु मंदिर उघडण्यास अजूनही परवानगी देण्यात आली नाही. तरी हिंदूंची मंदिरे, देवस्थाने यांच्यावरील बंदी उठवून ते पुर्ववत सुरू करण्याबाबतचे निवेदन सोमवार 19 ऑक्टोबर रोजी धर्मजागरण समन्वय, विदर्भ प्रांत संस्कृती विभागाद्वारे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. ‘दार उघड देवा! दार उघड!’ ही जणू आर्त हाकच पुकारली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना व्यवहारबंदीची उपाययोजना उत्तम आखली होती. परंतु आता बाजार, व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी सरकारने दिली आहे. त्याचा वेळही वाढविण्यात आला आहे. परंतु समाजाचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे, देवस्थाने अजूनही उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.

मंदिर किंवा देवस्थान हे मानवाचे मनोबल वाढविणारे, मनाला शांती देणारे, समाजाला कोणत्याही संकटाशी लढण्याची प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे मंदिरावरील बंदी उठवून पूर्ववत सुरू करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी काळाराम मंदिर सेवा संस्था, श्री रंगनाथ स्वामी सेवा समिती, जैताई देवस्थान या मंदिर संस्थानाचे सदस्य उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.