अथर्व मुंडेचे NEET परीक्षेत घवघवीत यश

★ सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव

0

सुशील ओझा, झरी: नुकतेच पार पडलेल्या नीट परीक्षेत मुकुटबन येथील अथर्व सिद्राम मुंडे याने 720 पैकी 621 गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. अथर्व हा मुकूटबन येथील गजानन महाराज महाविद्यालयातील प्राध्यापक सिद्राम मुंडे यांचा मुलगा आहे. अथर्व याने अथक परिश्रम घेऊन या परीक्षेत यश संपादन केले आहे. तो याचे श्रेय आईवडिलांना देतो.

कठोर मेहनत, परीश्रम आणि संघर्ष यामुळे एखादा माणूस जीवनात प्रचंड यश मिळवू शकतो. शून्यातून विश्व उभे करणाऱ्या दिग्गज व्यक्तींची आपण उदाहरणे देत असतो. अगदी सामान्य असलेल्या व्यक्ती आयुष्यात असे काही करून दाखवतात की, त्यांची दखल संपूर्ण जग घेते. माणसाच्या आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि तो माणूस अमूलाग्र बदलतो.

ध्यास, धडपड, सातत्य, प्रामाणिकपणा, कौशल्य, बुद्धिमत्ता, कठोर मेहनत, जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती यांच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरावर विराजमान होऊ शकतो हे अथर्वने दाखवून दिले आहे. त्यांने आपल्या कुटुंबासह शाळेचे व समाजाचे नाव लौकिक केले आहे.

अथर्वला मुकूटबन येथील गजानन महाराज विद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. त्याच्या या श्रेया बद्दल परिसरात कौतुक होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.