आज कोरोनाचे 5 रुग्ण, कुरईत कोरनाचा कहर सुरू

वणीतील रुग्णसंख्या रोडावली, ग्रामीण भागात शिरकाव वाढला

0

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये सर्व रुग्ण हे आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये कुरई येथे 3 रुग्ण तर गणेशपूर व तेजापूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 755 झाली आहेत. वणी शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात आता कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

आज यवतमाळहून 55 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 50 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 37 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात सर्व व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 14 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 31 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 72 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 755 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 682 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेल्या 3 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 72 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 50 जण होम आयसोलेट आहेत. 22 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 11 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय
तालुक्यात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 22 पर्यंत आला होता. त्यामुळे तालुका कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल करतोय असे दिसतानाच कोरोनाने पुन्हा रुद्रावतार धारण केला. आता वणी शहरात जरी आकडा कमी होत असताना दिसत असला तरी ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. यात सुंदरनगर आणि कुरई येथे रुग्णसंख्येत सारखी वाढ होताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.